Sunday, January 19, 2025

देव टाक्यांचे पाणी


प्रिय जनहो ,mitrancheramayan.blogspot.com
आज. आपण सर्व  एका जण सुख सोहळ्याला  जमलो आहोत ,आणी AASTRID   माझ्या सर्व सहकाऱ्यांनी  ह्याचे आयोजन केले आहेत हि एक विशेष बाब आहे .  विशेष म्हणायचे ह्या साठी कि ह्या सुख सोहळ्याची जराही कुणकुण   उत्सव मूर्तीला    लागू देता हा आनंदोत्सव संपन्न होत आहे आणि आस्त्रीद च्या दृष्टीने हि आश्चर्यजनक बाब आहे,कारण पारदर्शी व्यवहार हे जणू ह्यांचे बोध वाक्यच आहे आणी यशाचे गमक ही
एक म्हण आहे कि उत्तम शेती,मध्यम व्यापार आणि  कनिष्ट नोकरी ,काही वर्ष पूर्वी आपला मराठी समाज हे विसरला आणी तेव्हाची आमची तरुणाई नोकरीच्या मागे लागली ,आणि समाजाच्या तरुण कर्तृत्वाला नोकरी पेशा आवडू लागला ,बाबू बनून खाबु व्हायची स्वप्न मराठी तरुणाईला दिवसा उजेडी पडू  लागली ,ह्या स्वप्नांनीच मर्द मराठ्याला कारकुनी  पेशात जोखडले आणी कारकुनाची एक पलटण व्यापार उदीम करणाऱ्या धाडसी  तरुणांना वेडगळ आणी अविचारी समजू लागली ,महाराष्ट्रातल्या उद्यमी वृत्तीला जणू एक ग्रहणाच  लागू पाहत होते
तुकोबांच्या एका अभंगात तुकोबा म्हणतात "मेळवोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे  वेच करी " चांगल्या व्यवहारांनी धन संचय करणे आणी " आणी कुठलाही लोभ  न करता व्यय करणे हा एक पुरषार्थ च आहे
स्वच्छ  आणि पारदर्शी  ह्या शब्दांना  व्यापारी  शब्द कोशात जणू जागाच नसते असा तक सार्वत्रिक गैर समज आहे  ,पण तुकोबांनी सांगितल्या प्रमाणे स्वच्छ आणि सचोटीने व्यापार करता येतो हे ज्या व्यापाऱ्यांनी दाखवून दिले त्या त आस्त्रीद कंपनी अग्रगण्य आहे .
ज़े पेराल ते उगवेल हाच निसर्गाचा न्याय आहे आणि तो सगळी कडे लागू होतो. सचोटीने केलेला व्यापार चांगलीच फळे देतो. आणि  हे शिकाव कोणाकडून तर आजच्या उत्सवमूर्ती कडून अथक परिश्रमाने ह्या तरुणाने एका व्यापारी संस्थेचे बीजारोपण केले  आणि त्याचा वेलू गगनंतरी पोहचला  आहे . श्री रवींद्र जगताप जे ह्या कंपनीचे नेतृत्व करतात त्यांच्या यशाचा आलेख थक्क करणारा आहे ह्या यशाची गुरुकिल्ली कोणती ,अनेक उत्तर येतील कोणी म्हणेल,नशीब,कोणी चलाखी म्हणेल काही नात्य्गोत्या चा विचार करतील  पण खरे कारण आहे तुकोबांच्या अभंगाचे तंतो तंत पालन
 आमच्या पंतप्रधानांनी एक नारा  दिला "सब कि साथ सबका विकास "पण हा संदेश जगताप साहेबांनी फार सुरवातीपासूनच अमलात आणला आपल्या सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन त्यांनी हा आस्त्रीद चा डाव मांडला आणि यशस्वीही केला सर्वश्री आशिष गिरप,सुबोध घैसास आणि गणेश केळकर ह्या आपल्या विश्वासू  सहकार्यांनी त्यांना मोलाची साथ दिली आणि अजूनही देताहेत ,ह्या कालखंडात बरेच लोक आलेही आणि गेलेही किंबहुना वैचारिक मतभेदाच्या नावाखाली त्यांना जावेही लागले ,असो पण जगताप साहेब मात्र  आपल्या वैचारिक मूल्यांपासून कधीही ढळले नाहीत आणि आपल्या स्वछ  आणि पारदर्शी व्यवहाराला विसरले नाहीत  त्यांच्या यशाचे गमक हेच.
वर्षे  त्याचे क्लीयारिंग  चे काम  आमच्याकडे होते ,आम्हा दोघाच्याही  व्यावसायिक जीवनातला तो एक सुवर्ण  काल होता ,बऱ्याचश्या  अविस्मरणीय  आठवणींच्या उबदार रमल खुणा सोडून वाटा वेगळ्या झाल्या पण मने नाहीत आयुष्यात ज्या मुल्यांची जपणूक आपण करतो त्या जपणारा दुसरा माणूस जेव्हा आपल्याला भेटतो तेव्हा वाटते जितं मया ,कारण ज्या विचारांना मी जपले ती जपान्यायोग्याच होती आहेत आणि भविष्यातही राहतील कारण सत्प्रवृत्ती हि काही कोणाची मिरासदारी आसत नाही आणि संपतही नाही गंगेच्या ओघा प्रमाणे ती सतत   राहील   आयुष्याच्या संध्याकाळी शांत पणे विचार करताना एक विचार मनाच्या पडद्यावर नकळत येतो कि जगताप साहेबांसारखे व्यक्तिमत्व तुला भेटले काही काळ तुम्ही बरोबर होतात काही कालच का असेना तुझे आयुष्य सोन्याचे झाले हे हि नसे  थोडके केवळ आणि केवळ वायानेच मोठा असल्याने प्राप्त झालेल्या निसर्गदत्त अधिकारांचे स्मरण करून आशीर्वाद देतो कि "जीवेत शरदः शतम"देव टाक्याच्या पाण्या सारखे स्वच्छ आणि निर्मळ मन असणाऱ्या ह्या माणसाला परमेश्वर उदंड  आणि निरोगी आयुष्य देवो हि प्रभू चरणी प्रार्थना करू माझे भाषण संपवतो .

Saturday, January 18, 2025

श्रीश देशपांडे

पुंडलिका भेटी पर ब्रम्ह आलेगा"
चिरंजीव श्रीश देशपांडे रविवारी मला भेटायला माझ्या घरी आला ,भेटायचं आहे भेटायचं आहे म्हणता म्हणता आज तो योग आला श्रीश ला परमेश्वराला सात दिवसाच्या विश्रांती नंतर पडलेले स्वप्न असे मी म्हणतो ते तंतोतंत खरे आहे ह्याचा मला प्रत्यय आला ,शत प्रतिशत मातीतला माणूस,त्याच्या येण्याबरोबर एक सात्विक मृद्गंध आला ,सात्विक सोज्वळ आणि विनयशील स्वभावाची कवच कुंडले ल्यायालेला हा कर्ण माझ्या फाटक्या झोळीत निसर्ग विषयक ज्ञानाचे पसायदान कधी देऊन गेला ते कळल
सुद्धा नाही ,माझ्या सारख्या शहरी माणसाला निसर्ग नियमाची बरचशी कोडी सोडवून सांगता सांगता रानातल्या शिवारात घेऊन गेला ,हिरवाई उभी केली ,आणि निसर्गातला पांडुरंग शब्दात चितारून गेला ,माझ्या भेटीला आलेल्या त्या पांडुरंगाला विट हि द्यायची मला सुचले नाही ,वारकरी घराण्याची पताका सर्वार्थाने खांद्यावर घेऊन आलेलेल्या ह्या वारकऱ्याच्या दर्शनाने तुकोबांचा एक अभंग आठवला "शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी"
शशांक रांगणेकर

एक कैलासवासी पार्ले .


एक कैलासवासी पार्ले .
काही वर्षापूर्वी  ऐकलेल्या  एका प्रहसनाचे नाव अजूनही मनाच्या सन्दि कोपऱ्यातून बाहेर पडतच नाही ,अजूनही घट्ट दडी मारून बसले आहे .कदाचित त्या अनामिक लेखकाची आणि माझ्या दुक्खचि सल एकच असावी.
माझा जन्म शिवाजी पार्क दादरचा आणि माझे शालेय शिक्षण  माझ्या आजोळी "दादांच्या बालमोहन विद्यामंदिर मध्ये झाले.आमच्या शाळेचा उल्लेख दादांची बालमोहन असाच होत होता आमचे दादा आणि आमची शाळा हि एकमेकांची अविभाज अंगे होती शाळेचा उल्लेख "दादांची बालमोहन असाच होत असे ,आजही शाळेचे नाव सांगताना "दादांची बाल मोहन विद्यामंदिर"असेच शब्द उमटतात ,गुरूंच्या नावांचे  इतके ठसठशीत मळवट भरलेले  गुरुकुल आम्हाला लाभले हे आमचे सदभाग्य ,त्यांचे प्रेम आणि आपुलकी आठवली कि अजूनही मन गहिवरते.खरोखर तसे प्रेम करणे आजच्या कुठल्याही "ज्ञान महार्षीला जमाने नाही हेच खरे.त्याकाळी शिवाजी पार्कला ग्यास्चे दिवे होते हातात सहा पुरुष लांबीची काठी घेतलेला महापालेचा एक कर्मचारी संध्याकाळ झाली कि एकेक करत दिवे पेटवत जायचा ,त्या दिव्यांच्या मंद प्रकाशात आसमंत उजळून जायचा , दादांच्या आठवणीने आजही मनाचा कोपन्कोपरा उजळतो ,आजोळी आजी आजोबांच्या आणि मामा मावश्यांच्या अनुभवलेल्या प्रेमाची चव अजूनही अवीट वाटते.
माझे बालपण जसे दादरला गेले तसेच दर शनिवारी संध्याकाळ  ते सोमवार सकाळ माझ्या आई वडलांच्या घरी विले पार्ल्याला जात असे.शिवाजी पार्क आणि विले पार्ल्यातल्या नरिमन रोड वरच्या रांगणेकर वाडीतही जात होता ,,दुहेरी निष्ठेला तेव्हा कुठलाही अटकाव नव्हता.
बालपणातले दिवस सुखाने जात होते ,धावपळ ,घाई हे शब्द जणू आमच्या साठी नव्हतेच ,खेळणे ,खाणे आणि हुंदडणे ह्या शिवाय आम्हाला काहीही माहित नसायछोटी छोटी कौलारू घरे हे पार्ल्याचे वैय्शिष्ट होते .बहुतेक सर्व घरे एक मालकांची आणि त्यांच्या बरोबर राहणाऱ्या एकाथावा दोन भादेकारुणा गुण्या गोविन्द्याने सांभाळून राहत असत.काही काही चाली वजा वाड्यात मालक आणि चारपाच भाडेकरू राहत असत.घराच्या भिंती केवळ मोठ्यांसाठी असत मुलांना त्या दिसतही नसत.
पार्ले टिळक विद्यालय,टिळक मंदिर ,पार्लेश्वाराचे मंदिर , गोखल्यांचे राममंदिर,शान्भागांचे मद्रासी राम  मंदिर,कुंकू वाडीतले हनुमान मंदिर,हि हि पार्ले करांची आद्य श्रद्धास्थाने.
 पार्लेश्वर हे पार्ल्याचे प्रमुख देवस्थान आणि श्रद्धास्थान ,कमीतकमी एकदातरी पार्लेश्वाराला हात जोडल्याशिवाय पर्लेकारांचा दिवस जात नसे ,लेले गुरुजी हे  तेथील प्रमुख गुरुजी ,पर्लेश्वारावर श्रद्धा नसलेला पार्लेकर विरळाच .रार्ह्त्रीय सेवा संघाचे शाखा पर्लेश्वराच्या लगतच्या इमारतीत चालत असे.
प्रत्येक देवस्थानाचे ठराविक उत्सव  पारंपारिक पद्धतीने साजरे केले जात    ,गोखल्यांच्या राम मंदिरात ,रामनवमीला सुंठवडा मिळत असे,मद्रासी  राम मंदिरात चैत्री नवरात्रीला भोजन  प्रसादाचा लाभ समस्त पार्लेकर घेत असत,त्या नंतर संपन्न होणारी रथयात्रा फारच देखणी असे.बहुतेक प्रत्येक घरातून नारळ वाहिला जात असे,प्रामुक्ख्याने ह्या रथयात्रेचे नेतृत्व शानभाग घराण्याकडे असे ,प्रसाद म्हणून परत दिलेल्या अर्ध्या नारळात लावलेल्या गंधाचा प्रासादिक आणि पवित्र सुवास अजूनही माझ्या मनात दरवळतो आहे ,मोठाल्या भांड्यात बनवलेले मिरी,गुळ आणि वेलची मिश्रित पेय "पानक"ह्या नावाने दिले जात असे.ह्या घराण्यातील एक पुरुष डोक्यावर रामाची मूर्ती घेऊन मंगलोरहून पार्ल्यात आले आणि त्यांनी ह्या राम मंदिराची स्थापना केली.त्यांना कवडीवाले बुवा ह्या नावाने समस्त पार्लेकर ओळखत,आणि त्यांच्या मंदिराला मद्रासी राम ह्या नावाने ओळखले ओळखले जायचे.
गोखल्यांचा राम मात्र पूर्णतः मराठी होता. खरे गुरुजी हे गोखले राममंदिराचे पुजारी होते.
सुभाष रोड वर खोसला घराण्याची एक खोसला निवास  नावाची  सुंदर इमारत आहे  तिच्या अग्रभागी एक श्री कृष्णाची एक देखणी मूर्ती आहे  ,दर गोकुळ अष्टमीला केशराचे सरबत प्रसाद म्हणून दिले जात होते.
पार्ले टिळक विद्यालय हा पार्ल्याचा मानबिंदू  होता,शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन  अतिशय दिमाखदार पद्धतीने साजरे होत होते,शिक्षक मंडळी आणि विद्यार्थी ह्या साठी भरपूर मेहनत घेत.आणि संमेलन नीटपणे पार पडलेकी शिक्षक मंडळींच्या  चेहऱ्यावर समाधानाची पावती दिसत असे.,सर्वश्री पेंढारकर ,भाऊ भागवत,बाबुताई रोडे,..कुलकर्णी ,सहस्त्रबुद्धे ,ह्या शिक्षक मंडळीनी पार्ले घडवले ,पार्ले टिळक मध्ये शिकलेल्या एकाच विद्यार्थ्याचे नाव सांगितले तर तेव्हाशालेने काय आणि कोण घडवले ह्याची पुरेशी ओळख होईल ते नाव म्हणजे पु .पुलंच्या नवा पुढे स्वर्गीय हा शब्द लावायची हिम्मत मला होत नाही पु स्वर्गात वगैरे कुठेही गेले नाहीत ते अजूनही आमच्यातच आहेत.
पूल ना पर्ल्याने घडवले आणि त्यांनी पार्ल्याला अजरामर केले.
लोकमान्य सेवासंघ हे पुलांचे श्रद्धास्थान ,पुलांचे  आजोबा ती.वामनराव दुभाषी हे पार्ल्यातल्या सारस्वत समाजाचे एक आदरणीय गृहस्थ होते ,प्रार्थना समाज रोड आणि अजमल रोड  ह्या परिसरात दुभाषी,देशपांडे,भेंडे फडणीस हि सारस्वत मंडळी राहत होती.दर.नेवरेकर,वाघ ,पाखाडे धुरंधर,रानडे हि काही तत्कालीन पार्लेकर मंडळी.
अण्णा साठे हे समस्त पार्लेकारांचे लाडके व्यक्तिमत्व त्यांच्या "विजय स्टोर्स "ह्या दुकानात उत्तम माल मिळतो ,चोख व्यवहार उत्तम माल हे त्यांचे  ब्रीद वाक्यच ,आणि ते अंमलातहि आणले  जायचे.अण्णा पार्ल्याच्या   सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीच्या नेहमीच अग्रभागी असत.अण्णाच्या मिठाला पार्लेकर कायमचे जागले.अण्णाचे पार्ले पार्लेकारांवारचे वरचे प्रेम केवळ अतूट.
श्री.सुमंत जोशी हे एक तत्कालीन बहुश्रुत व्यक्तिमत्व.ते दैनिक नवशक्तीत उपसंपादक होते,टिळक मंदिर रोडच्या कोपऱ्यावर त्यांचा "यश्मुना"नावाचा बंगला होता,ग्यालरीत बसलेले सुमान्त्जी सायंप्रकाशात एखाद्या ऋषी सारखे भासतपर्लेकारांचा पिंडच कलावंताचा होता ,लोकमान्य  सेवासंघाने सोज्वळ आणि संपन्न अदाकारी पार्लेकाराना शिकवली ,अनेक गायक गायिकांना घडवले नावारूपास आणले,दत्ता जोगदंड,लालजी देसाई ,..जयवंत कुलकर्णी .....नीला भिडे सारख्या उदयोन्मुख कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप नेहमीच मारली.
छोटसे असे हे उपनगर काही वर्षापूर्वी फार टुमदार होते ,बहुतेक वस्त्यांना अमक्याची  वाडी तमक्याची वाडी ह्या नावाने ओळखले जायचे,पार्ले स्टेशन वरचे मद्रास क्याफे हे माझ्या माहितीतले सर्वात जुने उपहारगृह .मागून आप्पा  जोगळेकरांनी गणपतीच्या सुबक मुर्त्या आणि मोदक दोनीही पार्ल्याला पुरवले.
पार्ले बिस्कीट कंपनी हे पार्ल्याचे सुगंधी गुपित.सर्व  जगभर प्रसिद्ध असलेली हि बिस्कीट कंपनी आपले अस्तित्व सुगंधाने पार्ल्याचे वातावरण सुगंधित करत होती..
पार्ल्याच्या फाटकाजवळ बहुसंख्य ख्रिस्ती लाल रंगाच्या  बांधवांची वस्ती होती.बरचसे ख्रिस्ती वसईकर ख्रिस्ती होते ,छोट्या छोट्या   वाड्यात ,बागायती करणे,
आणि पार्ले मार्केटात ते विकणे हा त्यांचे  रोजचे काम असे पार्ल्यात मिळणारी ताजी पालेभाजी,भेंडे,दोडकी पडवळ सारख्या भाज्यांचा पुरवठा ह्या मंडळीने पार्ल्याला वर्षानुवर्षे केला.
सणासुदीला आंब्याचे पान,भाताच्या ओम्ब्या आणि गावठी झेंडू हाताने गुंफून बनवलेली तोरणे हि ह्या समाजाने समस्त पार्लेकरांना वर्षानुवर्षे पुरवली. लाल रंगाच्या चॊकदिच्य नउवारी साडी नेसलेल्या ख्रिस्ती भगिनी पार्ले मार्केटात बहुसंख्येने दिसायच्या.पाणथळ भागात बागायतीचे काम करणाऱ्या ह्या मंडळीना हत्ती रोगाची लागण झालेली दिसायची ,त्या पायांना जळवा लावणे हा एक खात्रीचा उपाय मानला जात होता.
बहुतक पार्लेकारांचा प्रवास सुमित्राबाई वाघ,अथवा टिळक प्रसूती गृहात सुरवात होऊन वाघाजी भाई ह्यांच्या हिंदू स्मशान भूमीत संपत असे.
पार्लेकर हा परवलीचा शब्द होता ,पर्ल्याबद्दल इतर मुंबई करांना नेहमीच कुतुहूल वाटत असे फक्त पार्ले कर ह्या नावाखाली अनेक प्रांतांचे समाजाचे लोक एकसंघ कसे होतात हे सुटणारे कोडे होते.
पार्ल्याला एअर  पोर्ट आला आणी इतर उपनगरांच्या मानाने पार्ल्यातल्या जमिनीचे  भाव वाढत चालले ,ते हनुमानाच्या शेपटाप्रमाणे आजही वाढत आहेत ,पार्ल्यातल्या अनेक लोकांनी आपल्या जागा विकून दोम्बाविलीला स्थलांतर केले.पार्ल्यात डोंबिवली फास्टची  सुरवात झाली.कित्येक वर्षे एकमेकांशी गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या मालक आणि भाडेकरून मध्ये भिंती उभ्या राहल्या ,उंच इमारतींचे जंगल  उभे राहिले ,बराचश्या वाड्या नामशेष झाल्या आणी त्या बरोबर पार्लेकर हि हरवला,झाडांच्ची आणी माणुसकीची हिरवळ सुकली.उंच उंच इमारतींच्या ओझ्याखाली माझे जुने लाडके पार्ले कैलासवासी झाले .



Thursday, March 14, 2024

चिमणाळ,

-- आई तुला नातू झालाय मी आणि नीला थोड्याच दिवसात तुझ्या नातवाला घेऊन येतो
आहेत तुला दाखवायला  निलेश  बोलत होता फोनेवर ,तू कशी आहेस बरी आहेस ना
बर ठेवतो आता मग रात्री फोन करतो नीलच्या शब्दाने  विद्या हरखून
गेलली  काय बोलायचे ते त्यांच्या लक्षातच येईना ,आनंद मना मावत नव्हता
आणि डोळे अश्रूना थोपवू शकत नव्हते ,आनुताई  आहो अनुताई इथे या जरा "येते
येते म्हणून शेजारच्या ब्लॉक मधून आनुताई आल्या ,
अनुताई विद्याच्या शेजारी आज ३५ वर्षे आनुताई त्यांच्या शेजारी राहत
होत्या ,विद्या जेव्हा महेश बरोबर ह्या फ्लॅट मध्ये आली त्या  दिवसा पासून
आनुताई त्यांच्या शेजारी राहत होत्या ,आगदी सक्ख्या बहिणी सारख्या दोघी
राहत होत्या ,विद्द्यापेक्षा ते सात वर्षांनी मोठ्या असल्याने विद्या
त्यांना अनुताई म्हणत असे आणी त्यापण तिला अगंतुगं म्हणून  आपलेपणा दाखवत
असत ,
अनुताई आपल्या निलेशला  मुलगा झालाय तो आणि नीला बाळाला घेऊन इथे येताहेत
,
थोड्याच दिवसात ,"अगबाई देवी पावली तुला  देवी पुढे साखर ठेव. फारच
छान  झाले बायो ,आज आपला महेश असता तर माझ्या बाळाला बाळ  झालाय म्हणून
घरभर  नाचला असता .असो देवाच्या इच्छेपुढे आपण काय करणार, आठवणी शिवाय आणि
काय करू शकतो आपण डोळ्यांना पदर लावत अनुताई म्हणाल्या .
विद्याच्या  पुढे ३५ वर्षांचा सारा भूतकाळ उलगडला गेला .
विद्द्याचे महेशचे लग्न झाले तेव्हापासून अनुताई  आणि गणेशभावजी
त्यांच्या शेजारी राहत होते. विद्या च्या लग्नात अनुताई आणि गणेश भावजी
आले तेव्हा महेशने सांगितले  कि हे माझे सक्खे शेजारी आणि नातेवाईकही ,हि
मामी काग आई ?हो बाळा मामीही आणि मावशीही अनुताई कडेवरच्या चार
वर्षाच्या छोट्या मुलाला म्हणाल्या ,माधव नाव होत त्यास मुलाचे. माधव
मामी आवडली का ?हो हो आवडली ना लाजता माधव म्हणाला ,,आणि खरोखरच मामी
माधवला  फारच आवडली होती आणि ममीलाही माधव. माधव मामीकडे सतत असायचा
,
मामा आणि मामी त्याचे फार लाड पुरवायचे ,अनुताई तर म्हणायच्या कि माझा
मुलगा माझा कि तुझा हेच कळेनासं झालाय बघ ,विद्या  म्हणायची
आपल्यादोघांचाही आहे तो. लग्नानंतर वर्षभरातच विद्याला दिवस गेले.
अनुताईंनी विद्द्याचे डोहाळे पुरवले ,माहेरची आठवणही येत नव्हती विद्याला
,
विद्याच्या बाळंतपणात अनुताई तिच्या आई प्रमाणे तिच्या बरोबर होत्या
,
विद्याने एका गोंडस मुलाला जन्म दिला ,बारशाच्या दिवशी नाव ठेवायचा मान
नात्याचा म्हणून अनुताईने नाव ठेवले नील "आग तुझा माधव गोरा आहे अणे हा
छोटा थोडासासा सावळा म्हणून नील  दोघे मिळून नील माधव बरका ,अनुताई
म्हणाल्या ,बारश्याच्या बाळंतविडा  म्हणून बरे काही आणले होते पण एका
वस्तूने मात्र विद्द्याचे लक्ष वेधून घेतले ,पाळण्याला बांधायचे एक सुंदर
चिमणाळ, ,छोटा माधवही खुशीत होता आपल्याला भाऊ मिळाला म्हणून ,आता तो
,
मला दादा म्हणायला   सांग ना त्याला दादा म्हणायला  तो सारखा हट्ट करी
,
आणि विद्याकडे तक्रार करी. अरे अजून लहान आहे तो त्याला बोलता येत नाही
अजून विद्या त्याला समजावत असे, निल थोडा मोठा झाला आणि एक दिवस दददादा
असे बोलल्यावर  माधव खुश झाला आता आपण खरोखर मोठे  झाल्याचे त्याच्या
वागण्या बोलण्यातून दिसू लागले होते. दिवसांना पंख फुटले ,दोन्ही मुले
मोठी झाली माधव इंजिनियर झाला आणि निल डॉक्टर . दोनीही मुलांचे लग्न झाले
,
माधव मोठा इंजिनियर झाला ,आणि निल डॉक्टर ,दोघेही परदेशी गेले ,` अचानक
काही दिवसात छोट्याश्या आजाराने गणेशभावजी  वारले आणि  दोन वर्षांच्या
अवधीत महेशही . योगायोग म्हणायचं कि काय हेच  विद्याला कळात नव्हते
,
शेजारच्या घरात घडणाऱ्या सुख दुःखाची प्रतिमा आपल्या घरातही  उमटतात
ह्याची पक्की खात्री पटली  तिला ,आणि त्या खात्रीने ती फारच घाबरली होती
विद्या ,माधव आणि त्याची बायको आपल्या नवजात मुलाला घेऊन आले आणि येतानाच
 
ते तिच्या माहेरी गेले ,सगळे दुःख अपमान विसरून अनुताई सुनेच्या माहेरी
गेल्या आणि "आई आता आम्हाला इथेच राहावे लागेल कारण हिच्या आईला आताशा
बरे  नसते, त्यामुळे आम्हाला इथेच राहावे लागेल,तू ये कधी कधी आम्हाला
भेटायला इथे ,. अनुताईंनी सगळे दुःख मनातल्यामनात ठेवलेआता निल येतोय
आपल्या बायकोला आणि मुलाला घेऊन तो हि  बायकोचा माहेरी जाईल कारण नीलाही
आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती ,आणि तिची आईही एकटीच असायची .
मुख्यम्हणजे सुख दुःखाची घटना अनुताईंकडे घडायची त्याचे प्रतिबिंब
विद्याच्या घरी उमटायचे.
निल आणि निला मुलाला घेऊन घरी आले ,अनुताईंनी आणि विद्द्यानी बाळ
बाळंतिणीच्या ताबा घेतला ,अनुताईंनी बाळंतविदड्यात एक सुंदरसा लाकडी
पाळणा  दिला होता   आणि पाळण्याला लावायला एक सुंदरसे चिमणाळे ,जरीच्या
रंगी बेरंगीं चिमण्यांचे बनवलेले ते चिमणाळे ,फारच सुंदर दिसत होते
,
अनुताईंचा स्वभावच त्यातून दिसत होता सुंदर सरळ तरीही मोहक आणि प्रेमळ
,
जसे जसे दिवस जात होते तशी तशी विद्द्याच्या मनातली  आणि अस्वस्तता
वाढत होती ,हे नातवाचे सुख काही दिवसांपुरतेच आहे निल कधी परत जाईल आणि
परत आपण एकट्या राहू काही सांगता येत नाही.   ,  "आई एक  आनंदाची बातमी
आहे  अनु मावशीही बोलवून घे मी अर्ध्या तासातच घरी येतोय  नीलचा फोन आला
,
विद्याच्या मनातली दुराव्याची भीती उसळी  राहिली ,निल येऊन  मला सांगेल
 
आई मला नवी मोठी नोकरी मिळाली आहे आणि परत इंग्लंड नाहीतर अमेरिकेला
जायचे आहे ,आणि आपला एकटेपणाचा प्रवास परत चालू   होईल ,विद्याचे डोळे
पाण्यानी भरून गेले ,डोळ्यासमोर  झुलणारा अनुताईंचा पाळणा आणि त्याला
बांधलेले चिमणाळे  ,दिसेनासे झाले ,तिला वाटले कि निल सांगेल कि मी आता
परत जातोय आणि तेही मोठ्या पोस्टवर ,अनुताईंच्या घरी पडलेल्या
एकटेपणाच्या दुःखाचे प्रतिबिंब आता नेहमी प्रमाणे इथेही उमटेल.
दरवाजा वरची बेल जोरात वाजली ,अनुताई  आणि निल दोघंही एकदांनाच आत आले
,
विद्द्याचे पाय लटपटत होते ,आल्याआल्या एक पेढ्याचा पुडा  उघडून
देवाच्या समोर ठेवला आणि एक पेढा अनुताईंच्या हातावर ठेऊन त्यांना
नमस्कार केला, एक पेढा आईच्या तोंडात भरावला ,विद्याला पेढ्याची कडूझार
चव जाणवली आणि ती अक्षरशः  कोसळली , "आई आई काय झाले ,निल ने आईला सावरले
,
अनुताईंनी विद्याच्याचेहऱ्यावर पाणी शिंपडले ,काय झाला अनुताई
म्हणाल्या ,काही नाही  काही नाही कस ,विद्याला आडवून निल म्हणाला
बारश्याच्या दिवसापासून मी बघतोय मी तुझं कुठेही लक्ष नाहीय ,बाळालाही
निरखून बघत नाहीस तू ,कसलीतरी एक भीती मला तुझ्या डोळ्यात डोकावताना
दिसते ,आई खरे सांग हि भीती मी परत परदेशी जाईन ह्याची ना ,निल म्हणाला
विद्या ओक्सबोकसी रडू लागली ,त्या आवाजाने निला  पण जागी होऊन बाहेर आली
,"
आई आम्ही तुम्हाला आणि अनुताईंना सोडून कुठेही जाणार नाही आहोत इथेच
तुमचा नातू मोठा होणार आहे नीलाने सांगितले ,. डोळे पुसत पुसत विद्द्यानी
निल आणि नीलला जवळ घेतले ,पाळण्यातले बाळहि  जागे झाले होते एक टक  लावून
ते चिमणाळ्या  कडे  पाहत होते.  ,अरे तुझी आनंदाची  बातमी सांग ना नील
"
आई मी आणि नीलने आपल्या देशातच राहून हॉस्पिटल  काढायचे ठरवले आहे आणि
आज त्या च्या जागेचे करारपत्र झाले हीच ती बातमी ,पण ती ऐकायच्या  अगोदरच
तू घाबरलीस  आणि बेशुद्ध पडलीस ,आता बरी आहेस ना , होतर अगदी छान आहे मी
,
बारा हत्तीचे बळ आल्यासारखे  विद्या उभी राहिलीअनुताई चला गोडाधोडाचा
स्वयपांक करूया आणि सगळेच जण इथेच जेऊया ,उत्साहाने विद्या आणि अनुताई
स्वयंपाकाला लागल्या ,जेवताना चार घास जास्तीचे खाऊन दोघीही लवकरच
झोपल्या , चेहऱ्यावर समाधानाची साय पसरली होती आणि दोघींच्याही स्वप्नात
बाळाचा पाळणा  हालत होता आणि त्याला टांगलेल चिमणळ दिमाखाने गिरगिरात
होते.


शशांक रांगणेकर